अडेगाव येथे ‘सरकार आपल्या दारी कार्यक्रम’

ग्रामवासियांनी वाचला विभागातील समस्यांचा पाढा

0

सुशील ओझा, झरी: संपूर्ण गावकरी यांचे समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने अडेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी होते तर प्रमुख पाहुणे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते.

झरी तालुका आदिवासी बहुल असून तालुक्यतील आदिवासी, शेतकरी व समान्य जनतेला अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून होणाऱ्या त्रासाबाबत. तसेच विविध योजनेबाबत माहिती जनतेपर्यंत पोहचत नसल्याच्या अनेक तक्रारी किशोर तिवारी यांच्यापर्यंर पोहचल्या होत्या. त्यामुळे अडेगाव येथे सदर कार्यक्रम घेण्याचे ठरले. या कार्यक्रमात अडेगाव सह परिसरातील हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती.

सर्वप्रथम तहसील कार्यालयाला नवीन रुजू झालेल्या महिला तहसीलदार अश्विनी जाधव यांचा सत्कार आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आला. अडेगाव ग्रामवासियानी गावातीलच तलाठी शेतकऱ्यांचे काम करीत नसल्याची तक्रार तसेच शेती सर्वे, कर्जाकरिता सहकार्य करीत नसल्यावरून त्याला चांगलेच धारेवर धरले. तर वीज वितरण कंपनीकडे शेतकर्यांना विद्युत पुरवठा, विद्युत सामान, ट्रान्सफर्मर राहून सुद्धा लावत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांनी मांडल्या.

कृषी विभाग व इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अधिकऱ्याकडून होणाऱ्या अनेक समस्या सदर कार्यक्रमात मांडण्यात आल्या. यावर किशोर तिवारी यांनी वरील सर्व तक्रारी त्वरित सोडवून शेतकर्यांना व आम जनतेला पूर्ण मदत करा अन्यथा आपल्या चुकीला स्वतः जवाबदार राहाल असा दम दिला.

कार्यक्रमाला सरपंच अरुण हिवरकर, तहसीलदार अश्विनी जाधव, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, सह गटविकास अधिकारी शिवाजी गवई, ठाणेदार धनंजय जगदाळे, पं.स सभापती लता आत्राम, मुन्ना बोलेनवार, अशोकरेड्डी बोदकुरवार, संजय दातारकर, बंडू पारखी, भास्कर सूर, गोविंदा उरकुडे, पोलीस पाटील अशोक उरकुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शिक्षक राजेश अक्केवार यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.