अतिक्रमित जागा खाली करण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम

गट क्रमांक 87 व 15 मधल्या जागेवर अनेकांचे अतिक्रमण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या गट क्रमांक 87 व 15 यात असणा-या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून या जागेतील सुमारे 80 टक्के जागा बाहेर गावातील लोकांनी हडप केल्याने संताप उसळला आहे. याबाबत प्रशासनाक़डे निवेदनातून तक्रार करण्यात आली होती. याबाबत आता नवनिर्वाचित सरपंच मीना आरमुरवार यांनी अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस देऊन 7 दिवसाच्या आत जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे.

गट क्रमांक 87  मध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता तसेच परवानगी न घेता काही लोकांनी यावर जनावरांचे गोठे बांधले आहे. या बाहेर गावातील अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीद्वारे सूचनापत्र देऊन समज द्यावी. तसेच शासन नियमानुसार गट नं 87 मधील जागेवर गावातीलच बेघर लोकांना 500 स्क्वेअर फूट जागा नोंदणी करून त्यांच्या सदर जागा त्यांच्या नावे करून द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली होती.

गट क्र 15 मधील 33 हजार स्केअर फूट जागा ही ग्रामपंचायतच्या मालकीची जागा ग्रामविकास दृष्टीकोनातून बसस्थानक उद्यान व ग्रंथालयची उभारणी करीता खुली ठेवण्यात आली होती. परंतु गावातील व बाहेर गावातील 15 ते 20 लोकांनी यावर कच्चे व पक्के घर बांधून या जागेवर अतिक्रमण केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चाळीवर देखील काही लोकांनी अतिक्रमण करून ताबा मिळविला आहे. याबाबत ग्रामपंचायतने सूचना पत्र दिले होते. परंतु अतिक्रमण धारकांनी सदर चाळ खाली करण्यास नकार देत कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता.

सदर अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार जिल्हाधिकारी,तहसीलदार, ग्रामपंचायत यांना शंकर लाकडे,विकास मंदावार ,गजानन मुके,शोभा गडेवार,छाया गडेवार,रमेश सामजवार,संजय गिरसावळे, विनोद कुमोजवार,रमेश मंदावार,संतोष काल्लूरवार,सुनीता कुंटावार,भास्कर बट्टावार, आकाश परचाके,प्रेमीला कडेलवार,शहनाज शेख,सुभाष शेखबंडीवार,संगीता मंदावार, कविता गोपशेट्टीवार व इतर ग्रामवासीयांनी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायत ने अतिक्रमण काढण्याकरिता दोन नोटीस दिले आहे.

हे देखील वाचा:

वणीमध्ये सलग तिस-या दिवशी अवघा 1 रुग्ण

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.