गाडगेबाबा चौकात विषारी सापाचा थरार !

सर्पमित्रामुळे मिळाले विषारी सापास जीवनदान

0

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारची वेळ… अचानक हरीष कापसे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला… पुढचा व्यक्ती घाबरत घाबरत बोलत होता… वणीतील गाडगेबाबा चौकात ठाकरे यांच्या घरी अतीजहाल विषारी साप घोणस निघाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. साप निघाल्याची माहिती मिळताच हरीष लगेच आवश्यक ते साहित्य घेऊन तिथे पोहोचला. आणि त्यांनी काही वेळातच सापाला कोणतीही इजा न होता पकडले.

माणसांनी प्राण्यांच्या राहण्याच्या जागेवर सिमेंटचे जंगले बांधळी परिणामी वन्य प्राणी आता शहरात आश्रय घेत आहे. आज साप म्हटले की सर्वांना त्याची भीती वाटते. साप दिसला की त्याला मारण्यातच अनेक जण धन्यता मानतात. अनेकदा दिसलेला साप विषारीही नसतो. अशा विषारी, बिनविषारी सापांना वणीतील सर्पमित्र हरीष कापसे पकडून त्याला जीवनदान देतो. तेही त्यांना कोणतीही इजा होऊ न देता.

हरीश गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडण्याचे कार्य करीत आहे. वणी व परिसरामध्ये कुठल्याही ठिकाणी साप निघाल्यास हरिषला फोन केल्यास हरीश त्वरित त्या ठिकाणी पोहचून सापाला पकडून देतो. व त्याला सुरक्षीतरित्या जंगलात सोडतो. विशेष म्हणजे यासाठी तो कोणतेही शुल्क घेत नाही. फक्त सापांबद्दल असलेला आदर व प्रेमापोटी हे कार्य करतो.

बुधवारी हरीष यांनी पकडलेला साप हा घोणस जातीचा साप होता. या सापाची लांबी पाच फूट आहे. साप पकडल्यानंतर त्यांनी लगेच वनविभागाशी संपर्क साधला. या सापाला केसुर्ली येथील जंगलात सोडण्यात आले.

या विषयी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना हरीष म्हणाले की
घोणस हा साप अतीविषारी आहे. तो एकाच वेळी 105 पिलांना जन्म देऊ शकतो. जरी साप विषारी असला तरी त्यांना मारलं जाऊ नये. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सर्व वन्य जीव जगणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठे साप निघाल्यास त्याला मारण्याऐवजी माझ्याशी संपर्क साधावा. परिसरात कुठेही साप निघाल्यास 7350264964 व 9604333396 या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.