सुशील ओझा, झरी:– तालुक्यातील मुकूटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षकदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म ५ सप्टेंबर ला झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येत होता . स्वतः शिक्षक असल्याने माझा वाढदिवस करण्याऐवजी याला शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचा ठरविण्यात आले.
तेव्हापासून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षकदिवस साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कु, प्राची नरांजे प्रमुख पाहुणे कु,केतकी वराटे ,मृदुला बोधे,समीक्षा आंबटकर,स्वेता खडसे,आचल जनुंघरी,जाणवही बरडे, ऋषिकेश ठाकरे, हर्ष टोंगे, श्रेया खडसे आदींनी शिक्षक म्हणून काम पाहिले आभार प्रतीक्षा मंदुलवार त्यावेळी ममता जोगी व कुमरे सह शिक्षकवर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.