Birthday ad 1

क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’

टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-यासाठी थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून निवड

0
veda lounge

निकेश जिलठे, वणी: टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-यासाठी वणीचा सुपुत्र, रणजीपटू सौरभ आंबडकर यांची टीमच्या सपोर्ट स्टाफ म्हणून निवड झाली आहे. या दौ-यात तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना असिस्ट करणार असून थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. आज सौरभ टीम इंडियासोबत मुंबई येथून श्रीलंका येथे रवाना झाला आहे. आयपीएलमध्ये सौरभ यांनी कोलकाला नाईट रायडर टीमसाठी असिस्टंट कोच म्हणून सेवा दिली आहे. सौरभच्या निवडीची माहिती वणीत पोहोचताच शहरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या भारतीय क्रिकेट संघ (टीम इंडिया) हा विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौ-यावर आहे. दरम्यान टीम इंडियाने श्रीलंका येथे शिखर धवन यांच्या नेतृत्वात संघ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिथे टीम इंडिया मर्यादीत षटकांचे काही सामने खेळणार आहे. टीम एकाचवेळी दोन दौरा करत असल्याने अतिरिक्त सपोर्ट स्टाफचीही नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. श्रीलंका दौ-यासाठी वणीच्या सौरभ आंबटकर यांची सपोर्ट स्टाफमध्ये वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच वणीच्या सुपुत्राने क्रिकेटच्या दुनियेत मोठी ‘डाईव्ह’ घेतल्याने वणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Jadhao Clinic

सौरभचे प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग करणा-या सौरभने शालेय क्रिकेटपासूनच आपली छाप सोडली. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी नागपूर येथे गेला. दरम्यान त्याने मुंबई येथे जगप्रसिद्ध क्रिकेट कोच स्व. रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवले. दरम्यान त्याची अंडर 14 च्या महाराष्ट्र संघात निवड झाली. त्यानंतर अंडर 16 व इंडर 19 तो मुंबई संघाकडून खेळला. त्यानंतर त्याने विदर्भाच्या टीमचे प्रतिनिधित्व करत विदर्भाकडून अनेक रणजी सामने खेळलेत. वणीतील झालेल्या अनेक तुर्नामेंटमध्येही सौरभने सहभाग घेतला होता. सध्या तो मुंबई येथे एका क्रिकेट अकाडमीत प्रशिक्षण म्हणून काम करतोय. याशिवाय दुबई येथे केकेआर संघासाठी त्याने बॉलिंग कोच म्हणूनही काम केले आहे.

सिनियर खेळाडुंसोबत काम करण्याचा अनुभव मिळणार – सौरभ
याआधी केकेआर संघासोबत काम केल्याने मोठ्या स्पर्धांचा चांगला अनुभव मिळाला आहे. यावेळी दिग्गज खेळाडुंना थ्रोडाऊन देण्याचा सराव झाला. टीम इंडियासाठी काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता ही संधी मिळाल्याने टीमच्या सिनियर खेळाडुंसोबत काम करण्याचा वेगळा अनुभव मिळेल. श्रीलंका दौरा संपल्यावर पुन्हा केकेआर संघासोबत आयपीएलसाठी जॉईन व्हायचे आहे.
– सौरभ आंबटकर, क्रिकेटर/प्रशिक्षक

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!