बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील वडगाव रोड येथे असलेल्या सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रितपणे पोस्टर मेकिंग स्पर्धा व क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेचा व बौद्धिक क्षमतेचा उत्कृष्ट परिचय करून दिला. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन पांडुरंग आंबटकर व प्राचार्य लियाकत अली यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
29 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मसी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी येथे पोस्टर मेकिंग स्पर्धा व क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर क्वीज कॉम्पिटिशनमध्ये चार गृप सहभागी झाले होते. दोन्ही स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्यात. पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये रिदा शौकत अली व प्राची पुनवटकर यांना विभागून पहिला क्रमांक मिळाला. क्विज कॉम्पिटिशनमध्ये हातिम पठाण, आरती राजूरकर, व तसमिया अंसारी या गृपने प्रथम क्रमांक पटकावला.
पोस्टर स्पर्धेचे परीक्षक म्हणून शुभम मदन यांनी काम पाहिले. तर क्विज कॉम्पिटिशनचे परीक्षण पल्लवी वाघमारे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सावृत्ती, टीमवर्क आणि फार्मसी व्यवसायाविषयी जागरूकता वाढीस लागली, असे मनोगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य लियाकत अली यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वर्ग पल्लवी वाघमारे, अश्विनी खिरटकर, अनुश्री गोहोकर, अवंतिका पावडे, कोमल कामडी, वीना वांढरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमोद देशमुख, पंकज निब्रड, मोईत शेख, तेजस्वीनी तोडासे यांनी परिश्रम घेतले.
सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी हे वडगाव रोड येथे असून या महाविद्यालयात डी.फॉर्म व बी. फॉर्मचे शिक्षण दिले जाते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे हे महाविद्यालय चालवले जाते. या कॉलेजचे हे दुसरे वर्ष असून उत्तम शिक्षणासाठी हे कॉलेज ओळखले जाते. शैक्षणिक उपक्रमांसह विद्यार्थ्यांच्या कला, खेळ व इतर गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम कॉलेजमध्ये राबवले जाते.

Comments are closed.