साऊ-जिजाऊ जयंतीनिमित्त आकापूरमध्ये विविध कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामस्वच्छता व जनजागृती रॅलीचे आयोजन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मारेगाव तालुक्यातील आकापूर येथे गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात व्याख्यान तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा होते. तर आकापूरच्या सरपंचा रेखाताई सातपुते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तम किनाके, पोलीस पाटील रविंद्र वाढई, ग्रामपंचायत सचिव गाडेकर मॅडम व जयसिंगजी गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी सात वाजता गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यात मान्यवर तसेच गावक-यांनी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ केला. त्यानंतर सकाळी 9 वाजता गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शाळेतील मुले आणि गावकरी सहभागी झाले होते. हातात फलक घेऊऩ घोषणा करत गावात जनजागृती करण्यात आली.

दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे दुसरे सत्र सूरू झाले. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. बेटी बचाव, हुंडाबळी, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण असे सामाजिक विषय या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही लयलूट होती. रांगोळी स्पर्धेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. यात गावक-यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कला सादर केली.

स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळीची पाहणी करताना मान्यवर

संध्याकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की दीडशे वर्षांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रोवला. महिला शिक्षणाच्या जोरावरच देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचल्या आहे. कधीकाळी ज्या डोळ्यांसमोर चूल आणि हातात फुंकणी असायची त्याच डोळ्यासमोर आता लॅपटॉप आणि हातात पेन आली हे केवळ सावित्रीमाईंमुळेच शक्य झाले आहे. सावित्रीमाईंनी शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य करून महिलांसमोर आदर्श निर्माण केला असून विद्यार्थींनीनी सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमल भरणे, अनिता देऊळकर, प्रतीक्षा कनाके, पुष्पा तिखट, उषा सिडाम, सुनिता सोनेकर, सुमित्रा भरणे, संगीता चटकी, प्रियंका भरणे, प्रतीक्षा जिवतोडे, बेबी जरीले, सुनिता वानखेडे, सगुणा वाढई, पुष्पा मंगाम, पूजा मंगाम, रंजना किनाके, वंदना काटकर यांच्यासह परिवर्तन ग्राम संघ आकापूरचे कार्यकर्ते व गावक-यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.