सावित्रीबाई फुले म्हणजे शिक्षणाचा झरा: प्रा. सुरेश पाटील

विवेकानंद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0

सुरेन्द्र इखारे, वणी: अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड सोडून शिक्षणाची कास धरली तर निश्चितच आपल्याला दिशा मिळेल, कारण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले ही शिक्षणाचा झरा आहे. सावित्रीबाई फुले ही ज्ञानाचा झरा आहे. त्या झऱ्याचा प्रवाह आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि आज आपण शिक्षण घेत आहोत. असे प्रतिपादन प्रा. सुरेश पाटील केले. कायर येथील विवेकानंद विद्यालयात युगनिर्मात्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सव साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष रामाजी गोंलावार हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश पाटील आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर, प्रमुख अतिथी संस्थासचिव सतीश घुले, मुख्याध्यापिका रेखा मडावी, अविनाश ठाकरे, संजय तेलंग, सुरेंद्र इखारे, रविकांत गोंलावार, योगेश सातेकर हे उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच पाहुण्यांचे स्वागत “स्वागताचा सोहळा” या समूह गीताने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेखा मडावी म्हणाल्या जी माणसे इतिहास घडवितात ती कधीच इतिहास विसरू शकत नाही. जी माणसे इतिहास विसरतात ती व्यक्ती इतिहास घडवू शकत नाही. पुस्तकाने मस्तक सुधारत असत त्यामुळे ते कधीच कोणापुढे नतमस्तक होत नसते. असे ही त्या म्हणाला. प्रमुख अतिथी सतीश घुले विचार व्यक्त करताना म्हणाले मोठे होण्यासाठी जाणीवेची गरज आहे. जाणीवा मेल्या तर जीवनात काहीच करू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण समाज शिक्षित झाला तो जाणीवेमुळे. स्वतःच्या जीवनात प्रेरणा रुजविल्या तरच जीवनच फलित होऊ शकते. असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थाध्यक्ष रामाजी गोंलावार, कोमल नवले, राजश्री घोडाम, भारती मिलमीले, शुभांगी गोदूरवर, आचल जींनावार, सेजल वाकडकर, अन्नपूर्णा धोटे, रविना सोयाम, पूजा ताजने, आचाल वरखडे बादल कोडपे, शिवानी उपरे, साक्षी महाकुलकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना कोरवते हिने केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले. सावित्रीबाई जयंती उत्सवात वेशभूषा मध्ये पूजा ताजने – शिक्षिका, निकिता मेश्राम – सावित्रीच्या भूमिकेत, वैशाली वैद्य, नैना इसरवार, रविना जुमनाके, वैष्णवी धुमणे, भाग्यश्री पिंपलशेंडे, जयश्री पंद्रे, वंशीका एलपुलवार होत्या. या वेशभूषेसह गावातून बँड पथकाच्या गजरात रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, दिलीप कांदसवार, मधुकर कोडपे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.