वणीत आमदार ख्वाजा बेग यांचा वाढदिवस साजरा

0

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांचा वणीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दिनांक 2 जानेवारीला विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांचा वाढदिवस असतो. गेल्या काही दिवसांमध्ये ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्रात डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात पक्षाने चांगलीच उभारी घेतली आहे. विविध आंदोलन करून जनतेचे विविध प्रश्न तडीस नेले आहे. नुकतच संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा हे आंदोलनही ख्वाजा बेग यांच्या मार्गदर्शनात पुकारण्यात आलं होतं. ते आंदोलनही यशस्वी झालं.


ख्वाजा बेग यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी दुपारी वणीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते गोळा झाले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. महेंद्र लोढा आणि जयसिंग गोहोकर यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.