सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा

आरोग्यसेवा, पुनर्वसन, सामाजिक बांधिलकी आणि नवोपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी आनंदवन (वरोरा) येथे शैक्षणिक दौरा केला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि स्वावलंबनाच्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळवली.

Birthday

विद्यार्थ्यांनी आनंदवन परिसरातील सितारतन लेप्रसी हॉस्पिटलला ला भेट देऊन OPD, IPD, पॅथॉलॉजी व फिजिओथेरपी विभागांची सविस्तर पाहणी केली. तसेच प्रिंटिंग वर्कशॉप, ‘Best from Waste’ कार्यशाळा, वुडन आर्ट गॅलरी, हँडीकॅप्ड म्युझिकल ऑर्केस्ट्रा आणि औषधी वनस्पती उद्यान यांचा अभ्यासपूर्ण अनुभव घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आनंदवनसारख्या प्रेरणादायी ठिकाणी भेट देणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक अनुभव नसून जीवनमूल्यांची शिकवण आहे. येथे आरोग्यसेवेबरोबरच स्वावलंबन, सामाजिक बांधिलकी आणि नवोपक्रम यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळते. अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयीन व्यवस्थापनाची प्रत्यक्ष ओळख होते आणि त्यांच्यात आत्मनिर्भर व संवेदनशील आरोग्यव्यावसायिक बनण्याची प्रेरणा निर्माण होते. – लियाकत अली, प्राचार्य

ही भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी ठरली. या शैक्षणिक भेटीत प्राचार्य लियाकत अली, प्राध्यापक पल्लवी वाघमारे, अश्विनी खिरातकर, अनुश्री गोहोकर, अवंतिका पवाडे तसेच सहाय्यक कर्मचारी प्रमोद देशमुख व सिद्धांत दरुंडे उपस्थित होते. आनंदवनच्या टीमकडून विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य लाभले..

Comments are closed.