वणीकरांसाठी हास्याची पर्वणी; भव्य हास्य कवी संमेलन

वणीत 3 मार्चला धुलिवंदनानिमित्त रंगणार हास्याचा जल्लोष

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या 25 वर्षांची परंपरा जपत अ.भा. अति दिड शहाणे सम्मेलन समिती, वणी यांच्या वतीने यंदाही धुलिवंदनाच्या निमित्ताने भव्य हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शासकीय मैदान, पाण्याच्या टाकी जवळ, वणी येथे हा रंगतदार कार्यक्रम होणार आहे.

हास्यरसाने ओथंबलेल्या या संमेलनात देशातील नामवंत कवी आपली उपस्थिती लावणार आहेत. मध्यप्रदेशचे शशीकांत यादव, नवी दिल्लीचे सरदार प्रताप फौजदार, सुरतच्या सुश्री सोनल जैन, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील अमित शुक्ला तसेच शाजापूरचे दिनेश देशी घी हे कवी आपल्या खास विनोदी शैलीतून वणीकरांना खळखळून हसवणार आहेत. त्यांच्या सादरीकरणामुळे धुलिवंदनाचा उत्सव अधिक रंगतदार होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी राजू उंबरकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, निकेश गुप्ता, प्रदीप बोनगिरवार, आशिष खुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा, भिकमचंद गोयनका, दीपक छाजेड, बंटी खुराणा, तुषार अतकरे व रमेश तांबे आदींनी परिश्रम घेतले आहेत.

धुलिवंदनाच्या उत्सवी वातावरणात रंगणारे हे हास्य कवी संमेलन वणीकरांसाठी खऱ्या अर्थाने हास्याची मेजवानी ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.