आज नगराळे हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन, गर्भाशय कॅन्सर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी: जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. 8 मार्च 2026) वणी येथील नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात महिलांसाठी ‘गर्भाशय कॅन्सर’ (Cervical Cancer) तपासणी तसेच त्यावरील लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्त्रीरोग तज्ञ सौ. संचित्ता विजय नगराळे (M.B.B.S., M.D., Gold Medalist – KEM Mumbai) या महिलांना आवश्यक आरोग्य सल्ला देणार आहेत. तसेच आयुर्वेदाचार्य सौ. सुवर्णा चरपे (BAMS, Dy.AC Pune) या ‘अंगावर पाणी जाणे व गंभीर समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराचे उद्घाटन किरण देवकर (अध्यक्ष – सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशन) यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात गर्भाशय कॅन्सर तपासणीसाठी पॅप स्मीअर टेस्ट उपलब्ध राहणार असून, या तपासणीची मूळ किंमत 800 ते 900 रुपये असताना शिबिरामध्ये केवळ 400 रुपयांत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची वेळ सकाळी 10 ते 2 अशी ठेवण्यात आली आहे.

या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी हॉस्पिटलमध्ये व दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.