एसपीएम विद्यालयाची कु. आरती दिलीप गोबाडे वणीतून प्रथम

सौरभ चंद्रकांत ठाकरे दुसरा तर कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे व कु. आर्या मत्ते शहरातून तृतिय

निकेश जिलठे, वणी: राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील तीन शाळेत पहिले तीन टॉपर या मुलीच आहेत. वणीतून शिक्षण प्रसारक मंडळ येथील कु. आरती दिलीप गोबाडे ही 500 पैकी 476 गुण (95.20 टक्के) गुण घेऊन शहरातून प्रथम आली आहे. लॉयन्सचा सौरभ चंद्रकांत ठाकरे हा 94.60 टक्के गुण घेत शहरातून दुसरा व शाळेतून प्रथम तर एसपीएम विद्यालयातील कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे व वणी पब्लिक स्कूलची आर्या सचिन मते या दोघीही समान 94.40 टक्के गुण घेत शहरातून तृतिय आल्या आहेत. विशेष म्हणजे कु. तेजस्विनी गव्हाणे ही लाठीकाठी, तलवारबाजी, मल्लखांब इत्यादी विविध मर्दानी खेळात तरबेज असून ती याचे मुलींना प्रशिक्षण देखील देते. कु. प्रतिभा रामदास घागी 94 टक्के गुण घेत एसपीएम शाळेतून तृतिय आली आहे.

जनता विद्यालयातील कु. श्रुती पिसाराम वाढई ही 93.80 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. श्रुतीला संस्कृत या विषयात 100 पैकी गुण मिळाले आहे. भावेश सुनील उपरे 92.20% गुण घेत शाळेतून दुसरा तर साहिल प्रदीप खिरटकर व जतिन रविकांत भोयर हे समान 90.40% गुण गेत शाळेतून तृतिय आले आहेत. शाळेचा 93.58 टक्के निकाल लागला आहे.
विवेकानंद विद्यालयातून 93.60 टक्के गुण घेत कु. दिपाली मारोती कातरकर ही प्रथम आली आहे. तर कु. कुमुदिनी हेमंत जोगी ही 92.40 टक्के गुण घेत दुसरी तर 87.20 टक्के गुण घेत कु. सुहानी संतोष दुपारे ही तिसरी आली आहे. विद्यालयाचा निकाल 83.14 टक्के इतका लागला आहे. या विद्यालयाचा निकाल 83.14 टक्के इतका लागला आहे.

लॉयन्स विद्यालयाचा 99.43 टक्के इतका निकाल लागला आहे. या शाळेतून सौरभ चंद्रकांत ठाकरे हा 94.60 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आला आहे. कु. मानसी भारत लिपटे ही 93.60 टक्के गुण घेत दुसरी तर यथार्थ अजय चल्लानी हा 93 टक्के गुण घेत शाळेतून तिसरा आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल लागला असून या शाळेतील कु. आर्या सचिन मते ही 94.20 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आली आहे. कु. हर्षदा आर आवारी ही 93.80 टक्के गुण घेत दुसरी तर कु. गुंजन एस बोबडे ही 92.40 टक्के गुण घेत शाळेतून तिसरी आली आहे.

छत्रपति शाहु महाराज 100 टक्के लागला आहे. रिबू हरीनारायण वर्मा हा 81.20 टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आला आहे. कु. रुक्सार शब्बीर खान पठाण ७०.४० राऊतिया वंश प्रकाश ७०.२० गुण घेत शाळेतून तिसरा आला आहे.

आदर्श हायस्कूल वणीचा 68.62% इतका लागला असून अंकित रामबाबू केवट – 81.40 % (हिंदी माध्यम) हा शाळेतून प्रथम तर कु. झिनत शेख ही 76.60 टक्के (मराठी माध्यम) गुण घेत दुसरी तर कु. टीना कुंडलवार ही 73.10% (मराठी माध्यम) टक्के गुण घेत तृतिय आली आहे.

जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालय वणीचा निकाल 93.75% लागला आहे. यात माहिया माहीन फिरोज अली 80.80%, टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आली आहे. तर अलीना सुबहान शेख 70.4% , रूषदाह अनम जाहिद खलील 69.29% अल्फिया परवीन जावेद शेख 70% गुण घेतले आहे.

Comments are closed.