शाळेची घंटा कधी वाजेल विद्यार्थी, पालकांएवढीच ‘ह्यांना’ही प्रतीक्षा

शाळा सुरू होताच ह्यांच्याही चेहऱ्यावर फुलेल तेवढेच हसू

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा कधी वाजेल. ह्याची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहेच. त्यासोबत पाठ्यपुस्तकं, वह्या आणि शालेयसामग्री विकणारेही डोळ्यात तेल टाकून शाळा सरू होण्याची वाट पाहत आहेत. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी आणि पालक सुखावतीलच. त्याच बरोबर शालेयसामग्री विकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही निश्चित हसू फुलेल.

आज सर्वत्र विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्गात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, शाळा कधी सुरू होणार, यालाच पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. तरी शाळा सुरू होण्याची प्रतीक्षेत विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग व त्यांच्यापेक्षा लाखो रुपयांची शालेय उपयोगी वस्तूची खरेदी करून बसलेले पुस्तक व बुक विक्रते, बाजारात ग्राहक नसल्याने शाळा केव्हा सुरू होईल या चिंतेत विक्रते आहे.

महाराष्ट्राततच नाही तर संपूर्ण जगात कोरोना विषाणू थैमान घालले आहे. लॉकडाऊन प्रकिया राबविण्या आली होती.आठ महिने होऊनदेखील परिस्थिती सुधारण्यापेक्षा उलट बिघडतच चालली आहे. तरीदेखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने हळूहळू परिस्थिती पूर्वरत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

अजूनही शाळा सुरू करण्याबाबत ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्यात येत असली तर विद्यार्थी, पालक वर्ग,शिक्षक यांना शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न भेडसावत आहे. त्यापेक्षा लाखो रुपयांची लागत लावून बसलेले शहरातील पुस्तक, बूकविक्रेते यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

जून- जुलै या महिन्यात शाळा सुरू होणार या अपेक्षेने दरवर्षी मार्च महिन्यातच पुस्तके, बुक, रजिस्टर, स्कुल बॅग, पेन्सिल, कंपास, वॉटरबॅग, आदी शालेय उपयोगी वस्तूंची खरेदीकरिता लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र राज्यातील व शहरातील कोरोनारुग्णाची वाढती संख्या बघता, राज्य सरकारच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलेही ठोस पावले उचलली गेली नाहीत.

ग्राहक कोरोना संसर्गाच्या भीतीने बाजारपेठेत येणे टाळत आहेत. तसेच वर्ग 12 वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे फक्त याच वर्गाच्या पुस्तकांची मागणी आहे. मात्र बूक, रजिस्टर, बॅग, आदी वस्तूची विक्री बंद असल्याने दररोजचे दुकान भाडे, माणसांचे वेतन व इतर खर्च करण्यातच पुस्तकविक्रते हवालदिल झाले आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.