बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथील प्रयास विज्ञान स्कूलमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जितेंद्र काळे .तसेच प्रमुख पाहुणे संस्था सचिव जितेंद्र काळे, उपमुख्याधापक शिवशंकर नांदे, अतुल पंधरे उपस्थित होते.
सुनीता काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सामान्य जिवनात असलेले विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले. तर विज्ञान विषयाचे शिक्षक गुणवंत आवरी यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवाची समाजाची प्रगती होते असे मत मांडले. विद्यार्थी नताशा, वीरश्री, सानिका, दानिश, सांची, प्राची, श्रेयस यांनी केलेल्या मॉडेल शाळेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन बळवंत जुमनाके यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर घूगरे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक दीपक कोवे, सपना बेसरकर, टीना मूळेवार, कल्याणी गाऊतरे, माधुरी कोकमवार, हर्षली मोहितकर तसेच शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.