भंगार वाहनांच्या लिलावातून शासनास मिळालेत 2 लाख रुपये

वणी पोलीस ठाण्यात 22 बेवारस दुचाकी वाहनांचा झाला लिलाव

0

जितेंद्र कोठारी, वणी : वर्षानुवर्षे वणी पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस पडून असलेल्या 22 दुचाकी वाहनांचा शनिवारी प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आला. लिलावात एकूण 52 लोकांनी बोलीत सहभाग घेतला असून 1 लाख 97 हजार रुपयांचा महसूल शासन जमा झाला.

विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या शेकडो दुचाकी वाहन खूप वर्षांपासून ठाण्याच्या आवारात होत्या. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्यात अनास्था दाखवली. अशा वाहनांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली. पाऊस, धुळीमुळे या वाहनांची अवस्था बकाल झाली होती.

लिलाव प्रक्रियेपूर्व वाहनांच्या मूळ मालकांनी मालकी हक्क, वारसा, तारण याबाबतचे मूळ दस्ताऐवज सादर करून वाहन घेऊन जावे. अन्यथा त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचा जाहीरनामा पोलिसांनी केला होता. मात्र लिलावाच्या तारखेपर्यंत कोणीही हक्क दावा केला नाही.

उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या परवानगीने शनिवारी वणी पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांच्या लिलाव संबंधी प्रक्रिया झाली. लिलाव प्रक्रिया तहसीलदार विवेक पांडे, पो. नि. वैभव जाधव, सपोनि माया चाटसे, हवालदार सुदर्शन वानोळे, सदाशिव मेघावत, शेखर वांढरे व पो.ना. अशोक टेकाडे यांनी पार पाडली.

हेदेखील वाचा

महागाई व कृषी कायद्याविरोधात किसान मोर्चाचे आंदोलन

हेदेखील वाचा

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

Leave A Reply

Your email address will not be published.