शहरात मध्यरात्री अल्पवयीन भंगार चोरट्यांचा सुळसुळाट

बांधकाम साईडवरुन सळाख, सेंट्रिंग प्लेट्स चोरीच्या घटनेत वाढ, .. पोलिसांची 'नाईट पेट्रोलिंग' संशयाच्या भोवऱ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात मागील काही दिवसांपासून भंगार चोरीची अनेक घटना घडल्या आहेत. निर्माणाधीन इमारतीच्या आवारातून लोखंडी सळई, सेंट्रींग प्लेट्स व इतर साहित्य चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. विशेष म्हणजे भंगार चोरट्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचे समावेश असून शहरात मध्यरात्री पासून दुचाकीवर गल्ली मोहल्ल्यात फिरून चोरी करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीयांचे म्हणणे आहे.

तालुक्यात विविध मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ते तसेच शहरात अपार्टमेंट आणि घरांचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम साईडवर ठेवलेल्या सळई, सेंट्रिग प्लेट, जॅक, फावडे, घमेले इत्यादी वस्तूंवर या अल्पवयीन चोरट्यांचा डोळा आहे. या अल्पवयीन चोरट्यांमध्ये काही मुलं फक्त मौजमजा व व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी करत आहे. किरकोळ भंगार खरेदी करणारे दिवसभर शहरात फिरून भंगार खरेदी करून उदनिर्वाह करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भंगार चोरटे काही मिनिटात हजारों रुपयांचा लोखंड चोरी करून मालामाल होत आहे. 

शहरात घरफोडी, चोरी, जबरीचोरी व लूटमारच्या घटना घडत असताना शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. नुकतेच वणी पोलीस स्टेशनमध्ये डीबी पथकाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शिवाय स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाचे स्वतंत्र कार्यालयही येथे उघडण्यात आले आहे. मात्र चोरटे पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे अनुभव नागरिकांना येत आहे. भंगार व दुचाकी चोरी करणाऱ्या या अल्पवयीन चोरट्यांवर पोलिसांनी वेळीच आवर घालावा, अन्यथा काही काळानंतर हे मुलं सराईत गुन्हेगाराच्या यादीत समावेश होईल. यात शंका नाही. 

भंगार तस्करांकडून अल्पवयीन मुलांचा वापर ?

भंगार व दुचाकी चोरीच्या घटनेत अल्पवयीन मुलांची सक्रियता चिंतेची बाब ठरत आहे. अठरा वर्षांच्या खालील मुलांकडून गुन्हा घडल्यास त्याला विधी संघर्षग्रस्त बालक म्हणून कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे भंगार तस्करीच्या व्यवसायात गब्बर झालेले काही तस्कारांकडून चोरीसाठी या अल्पवयीन मुलांचा वापर तर केल्या जात नाही ना ? याची सखोल चौकशी पोलिसांनी करणे गरजचे आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.