वरली मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांचे धाडसत्र

इंदिरा चौक परिसरात मटका पट्टी फाडणाऱ्या दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात ठिकठिकाणी सुरु असलेले मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाडसत्र मोहीम सुरु केली आहे. शुक्रवार 6 जानेवारी रोजी दीपक टॉकीज चौपाटी व रामनगर वार्डात मटका पट्टी फाडताना अटक केली. तर शनिवार 7 जानेवारी रोजी इंदिरा चौकात सिटी पॉइंट बार समोरील गल्लीत मटका जुगार खेळविणारे दोघांना वणी पोलिसांनी अटक केली.

शाहरुख खान साहेबखां पठाण (28) रा. खरबडा मोहल्ला वणी व बबलू रसूल खान (36) रा. शास्त्रीनगर, वणी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून वरली मटका साहित्य व नगद असे 3780 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर मटका जुगार अड्डा आशीद खान असरउल्लाह खान (36) रा. गुरूनगर याचा असल्याची कबुली अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 12 (अ) व सहकलम 109 भादवी अन्वये गुन्हा दाखल केले आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनी माधव शिंदे, स.फौ. सुदर्शन वानोळे, डोमाजी भादिकर, पोलीस हवालदार सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिंदर भारती, सागर सिडाम, पुरुषोत्तम डडमल यांनी केली.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!