उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

0

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास वणीचे उपविभागीय अधिकारी हे वणीवरून यवतमाळ येथे जात असता वाटेतच लालपुलिया येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात चालक व उपविभागीय अधिकारी यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे वृत्त आहे. 

Podar School 2025

सकाळच्या सुमारास उपविभागीय अधिकारी राऊत व त्यांच्या सरकारी वाहनाचा चालक राकेश लकशेट्टीवार हे वणीवरून यावतमालकडे सरकारी कामानिमित्त बोलेरो वाहन क्रमांक एम एच 29 एम 9505 ने जावयास निघाले. वाहन हे लालपुलिया जवळ असतांना चालकाने ब्रेक मारला. ब्रेक लावताच  वाहन अचानक पलटी झाले. यामध्ये उपविभागीय अधिकारी व चालक सुरक्षित बाहेर निघाले. यात कुणालाही दुखापत झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.