वणी बहुगुणी डेस्क: महसूल विभागाने रेती तस्करी विरुद्द एका महिन्यात दुसरी कारवाई करत घुग्गुस येथून अवैध रेती भरून वणीच्या दिशेने येत असलेल्या हायवा ट्रक मंदर जवळ पकडून रेती तस्कर विरुद्द गुन्हा दाखल केला आहे.
नायब तहसीलदार वैभव पवारला मिळालेल्या सूचनेवरून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बुधवारी वणी घुग्गुस महामार्गावर मंदर गावजवळ ट्रक क्र. MH 43 BG 4814 थांबवुन तपासणी केली असता त्यात 5 ब्रास रेती भरलेली होती. महसूल अधिकाऱ्यांनी ट्रक चालकास रॉयल्टी मागितली. मात्र चालकांनी सदर ट्रक व त्यातील रेती वणी येथील समीर परवेजच्या मालकीचे असून रॉयल्टी नसल्याचे सांगितले. त्यावरून नायब तहसीलदार वैभव पवार यांनी ट्रक जप्त करून वणी पोलीस स्टेशनमध्ये उभे केले. तसेच रेती तस्कर समीर परवेज रफिक रंगरेज विरुद्द महसूल अधिनियम कलम 48 अनव्ये गुन्हा दाखल केला.
‘रंगा-बिल्ला’ जोडीचा हैदोस
माहितीनुसार वणी येथील समीर परवेज व उमेश पोद्दार दोघे अवैध रेती तस्करी व्यवसायात संलग्न असून वणी क्षेत्रात दोघांची जोडी “रंगा -बिल्ला” जोडीच्या नावाने ओळखले जाते. या जोडीतले उमेश पोद्दार विरुद्द रेती तस्करी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांना धमकी देणे प्रकरणी 21 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दर्ज आहे. पोद्दार सद्य अंतरिम जामीनवर असून त्याची जामीन कालावधी आज संपणार आहे.