कु. सीमा कुमरे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार?

काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल; निवडणूक घडामोडीला वेग

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक चळवळीत सक्रिय कु. सीमा मनोहरराव कुमरे यांनी काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार, 30 ऑक्टोबर होती. या शेवटच्या दिवशी एकूण नगरपालिकेसाठी एकूण 32 तर जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी 25 अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.

दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली असून, शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रमुख पक्षांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. या प्रक्रियेला पक्षांतर्गत उत्साह दिसून येत असून, कार्यकर्त्यांमध्ये चर्चांचा धुराळा उडाला आहे. काँग्रेससह इतर पक्षांमध्येही उमेदवार निवडीसाठी बैठका आणि सर्वेक्षणे सुरू झाली आहेत.

कु. सीमा कुमरे यांचा अल्प परिचय
कु. सीमा मनोहरराव कुमरे या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी असून, त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला आहेत. सीमा या एम.ए. (राज्यशास्त्र) शिक्षित असून, सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत. युवा व तडफदार उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियावरही त्या सक्रिय असून, या माध्यमातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काँग्रेससह इतर पक्षांमध्येही उमेदवार निवडीसाठी बैठका आणि सर्वेक्षणे सुरू झाली आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीत यावेळी युवा चेहऱ्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या युती-आघाडी बाबतही स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही त्यांच्याकडे काही सक्षम उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीच्या चर्चेला चांगलीच रंगत आली आहे. 

Comments are closed.