पुरुषोत्तम नवघरे, वणी: हिंदवी स्वराज्य म्हटलं, की डोळ्यांसमोर छत्रपतींसह लढणारे लढवय्ये मावळे डोळ्यांसमोर उभे ठाकतात. त्यांची तुफानी तलवारबाजी, त्यांचा दांडपट्टा, लाठीकाठी याची कल्पना करताच अंगावर शहारे येतात. तोच शिवकाळ साकारण्याची धडपड बारावीत शिकणारी तेजस्विनी राजू गव्हाणे करत आहे. शिव आनंद व रॉयल फाऊंडेशनने वणीच्या आदर्श शाळेत वर्षभरासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यात तेजस्विनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण त्यात देत आहे.
महाराष्ट्रदिनाचं औचित्य साधत हे शिबिर सुरू झालं. संपूर्ण वर्षभर हे शिबीर चालणार आहे. आजचा काळ धकाधकाचीचा आणि असुरक्षिततही आहे. महिला असो की पुरुष दोघांनाही आत्मरक्षणाची गरज आहे. स्मार्ट फोनच्या जंजाळात अडकलेले मैदानी खेळांपासून दूर चाललेत. पर्यायानं पारंपरिक मैदानी खेळ लुप्त होत चाललेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे तंत्र सर्वांपर्यंत पोहचायला हवे. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा. योणारी पिढी सक्षम असली पाहिजे. तिला संघर्षासाठी सज्ज राहता आलं पाहिजे. लढता आलं पाहिजे. अशी अनेक उद्देशं तेजूची आहेत.
विशेष म्हणजे, हे शिबिर मोफत आहे. रोज जवळपास 100 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवतील. रोज संध्याकाळी 4.00 ते 6.00 या कालावधीत आदर्श हायस्कुल वणी येथे हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीकरिता राजू गव्हाणे 9764253253, विजू गव्हाणे 9822926480 यांच्याशी संपर्क करावा. या मोफत प्रशिक्षण वर्गाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
Comments are closed.