बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वणीत आत्मक्लेश आंदोलन होणार आहे. 2 अक्टोम्बर ला संपूर्ण विदर्भात हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील 11 हि जिल्हे व 120 तालुके एकाच वेळी सहभागी होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्याद्वारा दिनांक 12 सप्टेंबरला बुधवारी वणीतील विश्राम गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला प्रमुख विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप उपस्थित होते. या बैठकी मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील, पूर्व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ऍड सुरज महातळे, यवतमाळ युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर, सुनील नांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
2 आक्टोम्बर ला होऊ घातलेल्या आत्मक्लेश आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने विदर्भवाद्यांनी व युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या बैठकीला देवराव धांडे, बाळासाहेब राजूरकर, मंगल चिंडालिया, शालिनीताई रासेकर, रुद्रा कुचनकर, आकाश सूर, सृजन गौरकर, संजय चिंचोलकर, गिरीश कुबडे, अक्षय कौरासे, बालाजी काकडे, रवी ढेंगळे, नारायण काकडे, नितीन तुराणकर, रोहित रणदिवे, उमेश रासेकर, अक्षय बोन्डे, प्रवीण गौरकार, आशीष घोडेस्वार, शंकर कुचनकर, गौरव जवादे, आकाश ढोरे, संकेत खिरटकर, शषांक बदखल, साईनाथ उईके, यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.