विवेक तोटेवार, वणी: दुकानात अधिक गर्दी करून व्यवसाय करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर वणी पोलिसांद्वारे कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोहमद अकबर मोहम्मद यासिन मोमीनपुरा वणी, आरिफ अली मोहम्मद अली चिकन सेंटर माळीपूरा वणी, विशाल देविदास मांढरे मासोळी विक्रेता, पुरुषोत्तम विठ्ठल निमकर खानावळ तेली फैल, संतोष सोमराज छुगवाणी गजानन स्वीट अँड जनरल स्टोअर्स सिंधी कॉलोनी, अरुण विठ्ठल भडगरे फळविक्रेता तेली फैल, दौलत खां लाल खां पठाण शास्त्रीनगर वणी यांचा समावेश आहे.
या सात व्यावसायिकांवर कलम 188, 269 नुसार कारवाई करण्यात आली आहे. हे विक्रेते आपली प्रतिष्ठानवर अत्याधिक गर्दी करून विक्री करीत असल्याचे दिसून आले. सदर कारवाई पीएसआय गोपाळ जाधव व एपीआय चाटसे यांनी केली.
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असल्याने आवश्यक सेवा सुरू फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये किराणा, भाजीपाला, मेडिकल दवाखाने ही प्रतिष्ठाने सुरू आहेत. परंतु काही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करीत आहे. अशा प्रकारे निष्काळजीपणे व्यवसाय करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर वणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.