सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सगनापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत रोहपट गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई असून याकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावे लागत असून ग्रामवासियात प्रचंड संताप उफाळला आहे.
रोहपट गावाची लोकसंख्या 965 असून गावात टच फाउंडेशन तर्फे बोअर मारून मोटर लावून पाणी पुरवठा केला जातो. तर गावात एकच विहीर आहे. उन्हाळा लागताच पाण्याचीवपटली खालावली आहे. त्यामूळे विहीर व बोअरचे पाणी कमी झाले आहे. एकच विहिर असल्यामुळे सम्पूर्ण गावातील जनता एकाच विहिरीवरून पाणी भरात आहे. तर बोअर मधून सुद्धा कमी पाणीपुरवठा होत आहे. विहिरीतील पाणी पूर्ण संपल्याने झाल्याने पाण्याकरिता संपूर्ण गावाला मोठी झळ पोहचत आहे.
गावाची ग्रामपंचायतची बॉडी 7 ची असून गावकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या सांगून सुद्धा सरपंच व सचिव यांनी बोअर मारून पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र याकडे त्यांच्याद्वारा चालढकल केली जात आहे. याशिवाय पंचायत समिती कडून पाण्याच्या टँकर करीत प्रस्ताव पाठविलेला नाही असाही आरोप गावकरी करीत आहे.
रोहपट गावात एकूण 6 पोडांचा समावेश आहे. त्यात डुबली पोड सटपोड, चिंचपोड, तांडापोड ही तांडे समाविष्ट आहे. या गावातील पाणी पुरवठा होत नसल्याने एक किलोमीटर पायदळ जाऊन विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. तसेच गारगोटी पोड वरील ग्रामवासीयांना सुद्धा 1 किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तरी पंचायत समिती व ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पोडातील रहिवाशी करीत आहे.
हे देखील वाचा:
रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात