वणी: वणीतील एसपीएम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सुमारे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक प्रकाश काळे यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं.
या शिबिरात प्रजनन, मासिक धर्म, महिला आरोग्य, वयात येताना होणारे बदल, एचआयवी, आहार, शारीरिक व भावनिक बदल, व्यसन इद्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. आनंद शोभणे, दिनकर लांडे, इंदू सिंग, ठाकरे, प्रकाश काळे आदींनी या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लैंगिक विषयावर अनेकदा मित्र मैत्रिणीकडून चुकीच्या पद्धतीन मार्गदर्शन केलं जातं. शिवाय त्यामुळे मनात अनेक गैरसमज निर्माण झाले होते. या शिबिरामुळे अनेक गैरसमज दूर झाले असून, असे शिबिर नेहमी होण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया एका शिबिरार्थी विद्यार्थीनीनं दिली.