गोडीगुलाबीने केली महिलेची शिकार, लग्नाचे नाव काढताच दिला नकार

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे शोषण, प्रियकर गजाआड

भास्कर राऊत, मारेगाव: महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती माहेरी परत आली. एके दिवशी तिची एका तरुणाशी मैत्री झाली. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेला आपले शिकार बनवले. मात्र लग्नाचे नाव काढताच तरुण बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार करणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर तरुणाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई मारेगाव पोलीस करीत आहेत.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका महिलेचा 2011 मध्ये विवाह झाला होता. पण 2012 मध्ये काही कारणाने सदर महिला पतीपासून विभक्त होऊन मारेगाव येथे किरायाने राहत होती. उपजीविकेसाठी या महिलेने मारेगाव येथेच एक स्टेशनरी दुकान सुरू केले. एकदा कुणाल दशरथ गोडे वय 26 वर्षे हा दुकानामध्ये काही वस्तू घेण्यानिमित्ताने गेला. त्यावेळेस या महिलेसोबत कुणालचा परिचय झाला.

दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यांच्यात संवाद वाढू लागला. पुढे ते एकमेकांना भेटू लागले.. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेम बहरू लागले. यातूनच अनेकदा यांच्यामध्ये शारीरिक संबंध होत गेले. त्यातच कुणालने महिलेला कुठेतरी नोकरी लावून देतो असेही सांगितले. अशातच दि. 8 सप्टेंबर 2021 ला कुणाल हा सदर महिलेच्या घरी मुक्कामाने होता. तिथेही त्यांचाच पती पत्नीसारखे संबंध होते. 2016 पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. 

काही दिवसानंतर या महिलेने या युवकाला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी युवकाने लग्न करण्यास नकार दिला. लग्नाला सतत नकार दिलाने आज दि. 18/10 2021 ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास महिलेने कुणाल गोडे विरोधात लैंगिक अत्याचार विरोधात तक्रार दाखल केली.

यावरून मारेगाव पोलीसांनी कलम 376, (2)(एन), 417, 506 तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, मारेगाव पोलीस ठाण्याचे ए. पी.आय. राजेश पुरी हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Comments are closed.