श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध

गणपती डेकोरेशन व पुजेचे साहित्य ही उपलब्ध

विवेक तोटेवार, वणी: वणीतील महाराष्ट्र बँकेजवळील श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे मातीच्या विविध प्रकारच्या व आकाराच्या गणेश मूर्ती वाजवी दरात उपलब्ध आहेत. यासह गणपती डेकोरेशनचे व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा असे आवाहन श्रावणी गणेश मूर्ती मॉलचे संचालक विजय मुळे यांनी केले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर महाराष्ट्र शासनाने बंदी आणली आहे. वणीतील मूर्तीकारांनी देखील शहरात होणा-या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. त्यानुसार नगर पालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रेत्यावर कारवाईचा इशारा देत पथकाची स्थापना केली आहे.

ही बाब लक्षात घेऊन शहरातील मूर्ती विक्रेते श्रावणी गणेश मॉल येथे मातीच्या विविध प्रकारच्या व आकाराच्या सुबक मूर्ती ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मॉलमध्ये 2 फूट उंची पर्यंतच्या इको फ्रेंडली मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. याशिवाय गणपती डेकोरेशन व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहेत.

मूर्तीसाठी बुकींग सुरू: विजय मुळे
इको फ्रेंडली ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही आमच्याकडे मातीच्या सुबक मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी बुकींग सुरु झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आतापासूनच आपली ऑर्डर बुक करावी व हा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा.

अधिक माहितीसाठी व बुकींगसाठी 9850914828, रवींद्र चिडे 9764453963,
राहुल चव्हाण 9503002951,
सारंग पिदूरकार 9075307573
या नंबरवर संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र बँकेसमोर श्रावणी गणेश मॉल येथे एकदा भेट द्यावी असे आवहन संचालक विजय मुळे यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.