परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा- कॉ. गीत घोष
राजूर येथे ईदनिमित्त परमवीर अब्दुल हमीद यांच्या तैलचित्राचे अनावरण
जब्बार चिनी, वणी: १९६५ ला पाकिस्तानने बलाढ्य अमेरिकेच्या सहाय्याने भारतावर युद्ध लादले. भारतीय सैन्यात असलेले अब्दुल हमीद आणि योद्ध्यांच्या ठायी असलेल्या जाज्वल्य देशभक्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या बलिदानामुळे भारताला त्या युद्धात पाकिस्तानला हरवून जिंकता आले.
त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा. असे प्रतिपादन कॉ. गीत घोष यांनी केले. राजूर येथे ईद ए मिलादुनबीचे औचित्य साधून परमवीर अब्दुल हमीद चौकातील शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राचे अनावरण प्रसंगी प्रमुख वक्ते ते बोलत होते.
परमवीरचक्रप्राप्त शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे कॉ. सुनील गेडाम होते. उदघाटकम्हणून प्रसिद्ध चित्रकार असित तेलंग, तर प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे कॉ. गीत घोष होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मारोती पाटील बलकी, पोलीस पाटील सरोज मून, वामनपाटील बलकी, अब्दूल हुसेन शेख, छोटूभाऊ श्रीवास्तव, कवी संजय पाटील, नजीम शेख, कॉ. कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, प्रा. अजय कंडेवार, साजिद खान, संजय काटकर, कवी-गायक राजेंद्र पुडके हजर होते.
या परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या नवीन तैलचित्राचे अनावरण येथील प्रसिध्द चित्रकार व पेंटर असित तेलंग यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ कुमार मोहरमपुरी यांनी तर संचालन महेश लिपटे यांनी केले आणि आभार जयंत कोयरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मो.नूर, ताहीद शेख, अक्षय खोब्रागडे, मंगल टिपले,अजीम शेख, गणेश कुमरे,महेश भगत,गोविंद डवरे, शेख नजीर, प्रज्वल रायपुरे आदींनी अथक परिश्रम घेतले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)