मुकुटबन येथे शहिद भगत सिंग यांच्या तैलचित्राचे अनावरण
सुशील ओझा, झरी: शहिद भगतसिह यांच्या १११ व्या जयंती निमित्त मुकुटबन येथील ग्रामपंचायत लगत असलेल्या चौकात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. शहीद भगतसिंह यांचे विचार तरुणांकरिता प्रेरणादायी असून त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित वर्गावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. त्यांचे विचार युवकांच्या मनात नेहमी रुजत रहावे या उद्देशाने भगतसिंह यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शंकर लाकडे होते तर उदघाटक सत्तार सर होते. उदघाटक भाषणात शाहिद भगतसिंह यांनी देशासाठी केलेल्या बलिदाना बाबत तसेच भगतसिंह भक्ती नसून एक शक्ती असल्याची उपमा दिली. तर अध्यक्षीय भाषणात शंकर लाकडे म्हणाले की भगतसिंग यांनी देशासाठी लढून इतिहास घडविला त्याचप्रमाणे गावाच्या विकासाकरिता, समाजाकरीता तसेच गोरगरीबा करिता लढून आपणही भगतसिंह बना असा संदेश दिला.
प्रास्ताविक भाषणातून नेताजी पारखी यांनी भगतसिंह यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी काही मान्यवरांचे भाषणे झाले त्यावेळेस सरपंच शंकर लाकडे, सत्तार सर, उपसरपंच अरुण आगुलवार, नेताजी पारखी, सुनील ढाले, डॉ चारथळ, डॉ जोगदंड, डॉ प्रेमनाथ लोढे,वसंता,संतोष बरडे,गणेश बुटे, देव येवले, केतन ठाकरे, केशव नाखले,आझाद उदकवार, संदीप आसुटकर सह गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कपिल शृंगारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वसंता थेटे यांनी मानले.