बसपातर्फे छ. शाहू महाराज जयंती साजरी
विवेक तोटेवार, वणी: बसपा वणी विधानसभाच्या वतीने मंगळवारी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. वणीतील विठ्ठल रखुमाई भवन येथे दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक वानखडे माजी पं स सदस्य वणी तर प्रमुख पाहुणे पुष्पाताई आत्राम होत्या. जितेंद्र डाबरे, जयंत साठे, अनिल तामगडे, वृशाली खानझोडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अशोक वानखेडे यांनी शाहू महाराजांचे जीवन, कार्य, जातीभेदाविरुद्ध लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व इतर कार्यावर प्रकाश टाकला. पुष्पाताई आत्राम यांनी शाहूमहाराजांचे विचार अमलात आणण्याची गरज असल्याचे मत मांडले. तर वृशालीताई खानझोडे यांनी महापुरुषांचे दिन सणासारखे साजरे करण्यात यावे असे आवाहन केले.
संत रविदास युवा मंच चर्मकार समाज संघटनेसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल महापुरुषांची तैलचित्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश लिपटे यांनी केले तर आभार विकी जंगले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मंगेश सोनुने, सुरेंद्र पुडके, राकेश वाघमारे, अंकुश पेटकर, अविनाश सातपुते, पंकज कांबळे, अमोल वानखडे, निता निमसटकर, प्रिया पुडके, सुजाता पुनवटकर, शशिकला वाघमारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने बसपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.