नायगाव येथे राष्ट्रवादीच्या शाखा फलकाचे अनावरण

निपाणी नायगाव पाणीदार करण्याचं वचन

0

विवेक तोटेवार, वणी: नायगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जवळपास संपूर्ण गाव उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. लोढा यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राकाँचे तालुका प्रमुख सूर्यकांत खाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Podar School 2025

नायगाव हे गाव वरोरा रोडवर वणी शहराच्या अगदी शेजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांच्या संपर्कात होते. त्यानुसार अखेर इथे राष्ट्रवादीची शाखा स्थापन करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष प्रवीण देठे, सचिव सचिन तुराणकर, कोषाध्यक्ष गिरीधर ठेंगणे, तर सदस्य म्हणून सुभाष उलमाले, नथ्थू तुराणकर, विनोद तुराणकर, जितेंद्र ठेंगणे, विलास गेडाम, प्रवीण डाखरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सदस्यत्व स्वीकारले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाखा फलकाच्या अनावरण सोहळ्यानंतंर गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावात अऩेक कुटुंबांच्या रेशन कार्डमध्ये तांत्रिक अडचण असल्याने त्यांना रेशनपासून मुकावे लागत होते. ही समस्या त्यांनी डॉ. लोढा यांच्या कानावर टाकली. डॉ. लोढा यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. रेशनकार्ड मध्ये असणारी तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. त्यामुळे नायगावातील अनेक कुटुंबीयांना आता रेशन मिळणार आहे. या सुधारित रेशनकार्डचे कार्यक्रमात वाटप करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी कार्यक्रमात आभार व्यक्त केले. तर नेते म्हणून नाही तर सेवक म्हणून कार्य करणार असे मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

गावक-यांना सुधारित रेशन कार्डचे वितरण करताना

निपाणी नायगाव करणार पाणीदार
अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की नायगावमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे हे गाव नायगाव निपाणी नावाने ओळखले जाते. आधी तर विशेष समस्या नव्हती पण गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण राज्यच दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यामुळे या गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावक-यांनी सहकार्य केलं तर गावाचा कायापालट करून निपाणी नायगाव हे पाणीदार नायगाव करेल असे वचन डॉ. लोढा यांनी अध्यक्षीय भाषणात दिले.

कार्यक्रमाच्या वेळी राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले यांच्यासह वणी आणि नायगावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.