वणी येथे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
"सांघिक आणि वैयक्तिक खेळाचा विद्यार्थी लुटणार आनंद"
विलास ताजने, मेंढोली: वणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात शालेय सत्र २०१८-१९ च्या पावसाळी क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रविंद्र जोगी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रामदास कांबळे, प्रा. हेमंत चौधरी, मंडळ अधिकारी देठे, बांगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाध्यक्ष तहसीलदार जोगी यांनी शालेय खेळाडुना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन क्रीडा शिक्षकांना केले. प्रास्ताविक मारेगावचे क्रीडा समन्वयक बंडू काकडे तर संचालन वणीचे क्रीडा संयोजक संतोष बेलेकर यांनी केले. आभार गारघाटे यांनी मानले. सभेला वणी व मारेगाव तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. यावेळी स्पर्धा आयोजन वेळापत्रक वाटप करण्यात आले.
ऑगस्ट ते सप्टेंबर अखेर पर्यंत चालणार स्पर्धा
स्पर्धेत फुटबॉल, योगासन, बुद्धिबळ, कुस्ती, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि मैदानी स्पर्धा आयोजित आहे. वणीचे स्पर्धा प्रमुख म्हणून मारोती कोंडगुर्ले, रणजीत पचारे, पवन ढवस, प्रवीण समर्थ, राजेंद्र खोंडे, धवल पटेल, मंगेश करंडे, नितीन कन्नमवार, रूपेश पिंपळकर, प्रा.दिलीप मालेकर राहणार आहे. तर मारेगावचे प्रमुख म्हणून विश्वांभर राऊत, पद्माकर एकरे, अरुण भरणे, प्रकाश म्हसे, ए. डी. चव्हाण, रोहन मोडक, राकेश नक्षीने, नितीन कन्नमवार, धनराज ठेपाले राहणार आहे.
क्रीडा सभेत गुरुदेव विध्यालय शिरपूर येथील क्रीडा शिक्षक किशोर आसुटकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार तहसीलदार रविंद्र जोगी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला.