श्याम टॉकीज चौकात रॉडने बेदम मारहाण, दोन जखमी

किरकोळ वादातून मारहाण, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील श्याम टॉकीज चौकात रविवारी संध्याकाळी क्षुल्लक गोष्टीतून वाद झाला. वादातून दोन जणांना मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, देवेंद्र सुधाकर भोयर (वय 40, रा. सुकणेगाव) हा आपल्या मित्र गणेश फकरु आडराणे (वय 40, रा. सुकणेगाव) याच्यासह मोटारसायकलने श्याम टॉकीज परिसरात चिकन घेण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला (क्र. MH31DJ2120) दुसरी मोटारसायकल (क्र. MH29BT4431) आडवी आली. यामुळे किरकोळ वाद निर्माण झाला.

वाद वाढताच मोटारसायकल चालकाने आपल्या वाहनात ठेवलेला ट्रॅक्टरचा हायड्रोलिक पाईप काढून भोयर व आडराणे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चौकशीत आरोपीचे नाव अक्षय प्रविन बोधनकर (वय 26, रा. आखाडा वार्ड, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ) असे समोर आले. पोलिसांनी जखमींचे वैद्यकीय तपासणी करून आरोपीवर बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(बातमीतील इमेज एआय जनरेटेड आहे)

Comments are closed.