पत्रकार जितेंद्र कोठारी यांना मातृशोक
वणी:- पत्रकार जितेंद्र कोठारी यांची मातोश्री शांतादेवी नेमीचंद कोठारी वय ७५ वर्ष यांचं राजस्थान येथील किशनगड येथे दीर्घ आजाराने निधन झालं. वणी येथून कोठारी कुटुंब नातेवाईकाच्या लग्नाकरिता मागील आठवड्यात राजस्थान येथे गेले व दोन दिवसापूर्वी लग्नातून महाराष्ट्रात परत आले. तर जितेंद्र कोठारी यांची आई राजस्थानलाच थांबल्या.
शांतादेवी कोठारी या गेल्या एका वर्षांपासून कर्करोग ( कँसर) या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर १६ डिसेंम्बरला त्यांची कँसरशी झुंज थांबली. त्याच्या निधनाची माहिती मिळताच वणी, यवतमाळ व नागपूर येथून जितेंद्र कोठारी, पवन व महावीर कोठारी ही तिन्ही मूल आपल्या आईच्या अंत्यविधि करिता कुटुंबियांना विमानाने घेऊंन नागपूर ते दिल्ली वरून राजस्थान रवाना झाले.
शांतादेवी यांचा अंत्यविधी सोमवारला राजस्थान येथे त्यांच्याच गावी होणार असून त्यांच्या मागे ४ पुत्र, पुत्री, नातू पणतू असा मोठा आप्त परिवार आहे. जितेंद्र कोठारी हे दै. दिव्यमराठीचे प्रतिनिधी तसेच वणी बहुगुणी या पोर्टलचे ज्येष्ठ प्रतिनिधी व सल्लागार आहेत.