वणीत शांतता कमिटीची बैठक

सर्वधर्म समभावाने सण-उत्सव साजरा करण्याचे आवाहन

0

विवेत तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस ठाण्यातील दक्षता गृहात ही बैठक झाली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम सण, उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपाययोजना आखण्यात आल्या. बैठकीत वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड, तलसिलदार शाम धनमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक, ठाणेदार वैभव जाधव व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या सण-उत्सव शांततेमध्ये पार पडावे याकरिता शांतता कमिटीची बैठक घेण्यात येते. पुढील महिन्यात येणारे गणपती उत्सव, बकरी ईद, गोकुळ अष्टमी हे सण व उत्सव शांततेत कसे पार पाडत येईल याबाबत चर्चा झाली. सोबतच अवैध दारू, गांजा तस्करी, रोडची समस्या, वाहतूक विभाग याबाबत समस्या मांडण्यात आल्या. कार्यक्रमात शांतता कमेटीतील सदस्यांनी विविध समस्याबाबत आपले मत मांडले. कमिटीमध्ये सदस्यांनी काही सूचना केल्या त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक यांनी दिले. त्याचप्रमाणे दुर्गा उत्सव गणेश उत्सव बकरी ईद गोकुळाष्टमी हे उत्सव शांततेत पार पाडण्याकरता कमिटीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्य सहकार्य करण्याची विनंती सुद्धा यामध्ये करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की, वणी हे अत्यंत शांत शहर आहे. या शहरात कधीही धार्मिक दंगे झाले नाही. वणीचा हाच इतिहास यावर्षीही कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक वणीकर करणार. सोबतच मानवाचा सर्वात मोठा धर्म हा मानवता आहे. त्यामुळे जातीय तेढ विसरून सर्वांनी एकमेकास मदत करावी ही विनंती केली. त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने योग्य सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून केले.

त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना पोलिस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नाईक यांनी काही विषय बोलून दाखवले त्यावर कारवाई लवकरात लवकर होणार असल्याचे आश्वासन याठिकाणी देण्यात आले. वणीमध्ये मागील सहा महिन्याच्या काळात अवैद्य व्यवसाय जवळपास संपुष्टात आल्याचे ग्वाही त्यांनी दिली. यापुढेही आपण अशीच कारवाई करत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. कार्यक्रमाचे संचालन रवी साल्फेकर यांनी तर आभार प्रदर्शन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.