मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सर्वधर्म समभावाने सण-उत्सव साजरा करण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम सण, उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपाययोजना आखण्यात आल्या.

तसेच दोन गटात वाद निर्माण करतील, असे कोणी समाजकंटक असतील तर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीत उपस्थित हिंदु, मुस्लिम बांधवासह प्रतिष्ठित लोकांकडून ठाणेदारांनी माहिती जाणून घेतली. सर्वधर्म समभावाने सण-उत्सव साजरा करण्याचे आवाहन ठाणेदार धर्मराज सोनुने व पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे यांनी केले. .

यावेळी अनिल पावडे, श्याम बोदकुरवार, दीपक बरशेट्टीवार, सुशील ओझा, नागेश अक्केवार, चिंतेश्वर वैद्य, सैयद जावेद, युसूफ खा पठाण, सैयद इब्राहिम, शेख लतीफ, शेख रशीद, शेख शफी व शेख खलिल, नीरज पातूरकर, सुलभ उईके, प्रदीप कवरासे, सुरपाम आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.