जत्रा मैदान रोडवर कुख्यात शेंगदाण्याच्या आवळल्या मुसक्या

ये-जा करणा-यांना चाकू दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

बहुगुणी डेस्क, वणी:- दारूच्या नशेत जत्रा मैदान रोडवर शस्त्र दाखवून दहशत माजवणा-याच्या वणी पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संजय उर्फ शेंगदाण्या वाघडकर असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर वणी पोलीस ठाण्यात आधीही गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वृत्त असे की बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री बंदोबस्ता दरम्यान ठाणेदार अजीत जाधव यांना खबरीकडून कुख्यात संजय उर्फ शेंगदाण्या वाघडकर रा. गोकुळ नगर वणी हा जतिरा रोडवर येणा-या जाणा-या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे विकास धडसे यांना पथकासह जत्रा रोडवर रवाना केले.

रात्री १० वाजताच्या सुमारास पथक गोकुळ नगर जवळील एका बार समोर शेंगदाण्या हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असताणा आढळला. पोलीस पथकाने शेंगदाण्यास शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश देतास त्याने हातातील शस्त्र हवेत भिरकावत होता. तसेच तो पोलिसांनाही शस्त्राचा धाक दाखवत होता.

दरम्यान जमादार विकास धडसे व पथकाने शिताफीने बळाचा वापर करून शेंगदाण्यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळील एक स्टील चा सव्वा फुटी धारदार चाकू जप्त केला. शेंगदाण्या हा नशेच्या अंमलात असल्याने आढळल्याने त्याला वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर शस्त्र अधिनियमचा 4, 25, भादंविच्या कलम 506 भारतीय दंड विधान तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 85(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे जमादार विकास धडसे, पोलीस अंमलदार श्रीनिवास गोनलावार यांनी केली. प्रकरणाचा तपास जमादार विकास धडसे करीत आहे.

हे देखील वाचा:

कटू आठवणी: बाजार समिती गोळीबार प्रकरणाला आज 17 वर्षे पूर्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.