कपाशीची नुकसान भरपाई देण्याची मागणी

शिंदोला ग्रामस्थांचे एसडीओंना निवेदन

0

विलास ताजने, (शिंदोला): वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकऱ्यांचे गतवर्षी कपाशी पिकावर आलेल्या बोन्डअळीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु सदर गावाला नुकसान भरपाई पासून वगळण्यात आले आहे. म्हणून कपाशीची नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शिंदोला येथील शेतजमिन माहूर देवस्थानच्या मालकीची आहे. परंतु पिढ्यानपिढ्या सदर जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात असून वहिवाट सुरू आहे. पूर्वी शेताच्या सातबारा वर वाहितीदार म्हणून शेतकऱ्यांचे नावे होती. मात्र नवीन कायद्यानुसार वाहितीदार शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आले आहे. तेव्हापासून विहितीदार शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणे, पिकांची नुकसान भरपाई मिळणे आदी शेतीविषयक सवलती पासून वंचित ठेवले जाते.

शेती खरीप हंगाम 2017- 18 मध्ये शिंदोला शिवारातील कपाशी पिकाचे बोन्ड अळीमुळे नुकसान झाले होते. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी देखील केली होती. सध्या बँकांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरु आहे. परंतु शिंदोला शिवारातील शेतकऱ्यांना सदर यादीतून वगळन्यात आले आहे.

त्यामुळे कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल बोन्डे, लुकेश्वर बोबडे,शांतीलाल जैन, मुरलीधर ठाकरे, प्रितम बोबडे, राजू कुमरे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.