संजय लेडांगे, मुकुटबन: ब्रिटीश खाण्यापिण्याचे शौकीन होते. झरी परिसरात असताना त्यांना इथली एक गोष्ट विशेष आवडायची. ती म्हणजे इथले शिंगाडे. मुकुटबनला ब्रिटिशकालीन तलाव आहेत. त्यातील प्रसिद्ध शिंगाडे आता मार्केटला विक्रीसाठी आलेत. हे चवीसाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यातच शिंगाळा निघायला सुरवात झाली. शिवाय शिंगाडा व्यवसायाचा जोर धरत व्यासायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. परिणामी शिंगाडा व्यावसायिकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलायला लागले आहेत.
मुकुटबनचा ब्रिटिशकालीन तलाव साधारणतः 300 हेक्टर जंगलव्याप्त परिसरात पसरलेला आहेत. तलावात विविध प्रजातींचे पक्षी पाहावयास मिळतात. या निसर्गरम्य तलावावर मासे, शिंगाडे आणि कमळाच्या फुलांचा व्यवसाय दरवर्षी अधिक चालतो. अशा नैसर्गिक सौदर्यांनी नटलेल्या तलावावर व्यासायिकदृष्ट्या 300-400 कुटुंब अवलंबून आहेत.
यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ब्रिटिशकालीन तलावातील शिंगाडे चवीसाठी प्रसिद्ध आहेत. नागपूर, चंद्रपूर, अदिलाबाद, वरोरा आणि यवतमाळ या शहरासह विविध राज्यातही शिंगाड्यांची अधिक मागणी आहे.
तलावातील मासोळ्यांची संख्या वाढली. त्याचा परिणाम शिंगाडा वेलींवर होऊन वेल मासोळ्या फस्त करीत आहेत. परिणामी यावर्षी शिंगाडा उत्पादनात मोठी घट झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. स्थानिक शिंगाडा व्यावसायिक तलावावर खरेदीसाठी हजेरी लावताना दिसतात. परंतु कोरोना महामारीच्या प्रकोपाने बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील व्यावसायिकांची संख्या कमी झाली आहे.
तलावातील शिंगाडा विक्रीसाठी बाजारात दाखल होताच, शिंगाडा व्यावसायिक जोमात व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागलेत. परिणामी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू लागले आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)