योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू गावाचे नाव उंचावू शकतात – संजय खाडे

शिरपूर प्रिमीयर लीगचे थाटात उद्घाटन, ग्रामीण भागात सुरु झाला क्रिकेटचा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात जरी मोठ्या स्पर्धा होत असल्या तरी ग्रामीण भागात मोठ्या स्पर्धा होण्याचे प्रमाण कमी असते. शिरपूर प्रीमियर लीगमुळे शिरपूर व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडुंना एक सुवर्णसंधी संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडुं रांगडे असतात. त्यांचा फिटनेस शहरी भागातील खेळाडुपेक्षा अधिक असतो. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचून आपल्या गावाचे नाव उंचावू शकतात, अशी आशा संजय खाडे यांनी व्यक्त केली. मंगळवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शिरपूर प्रीमीयर लीगचे रंगनाथ स्वामी अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड होते.

शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही क्रिकेटचा थरार सुरू झाला आहे. मंगळवारी दिनांक 21 नोव्हेंबर पासून शिरपूर प्रीमियर लीगच्या सिजन 2 ला सुरूवात झाली आहे. कैलास क्रिकेट मंडळ, शिरपूर तर्फे एसपीएल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये एकूण 6 टीम असून यात शिरपूरसह शेलू, चारगाव, वारगाव, वारगाव (नवीन) खांदला, गोपालपूर, बोरगाव, मेंढोली, वरझडी, बंडा, गोपालपूर (व) या गावातील खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 35000 हजारांचे प्रथम पारितोषीक तर उपविजेत्याला 25 हजारांचे पारितोषीक आहे. यासह इतर बक्षिसांची देखील मोठी लूट आहे. शिरपूर येथील शासकीय मैदानावर हे सामने आहे. शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी किंवा रविवारी दुपारी 12 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात परिसरातील प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कैलास क्रिकेट मंडळातर्फे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचा पहिला सिजन झाला होता. त्याच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कैलास क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व गावकरी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.