जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलोरा रेती घाटाचा लिलाव झाला असून अवैध रेती तस्करीलाही उधाण आले आहे. अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर शिरपूर पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून गुरुवार 3 फेब्रु. रोजी दुपारी 2.३० वाजता सुमारास पकडले. कारवाई दरम्यान दुसऱ्या ट्रॅक्टरचा चालक रेती खाली करून ट्रॅक्टरसह पसार झाला.
कवडशी घाटातून दिवसाढवळ्या रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड याना मिळाली होती. ठाणेदार करेवाड यांनी वणीचे तहसीलदार धुळधरे याना याबाबत माहिती दिली. त्यानंतर महसूल व पोलिस प्रशासन यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. माहितीचे आधारे पथकाने गुरुवार 3 फेब्रु. रोजी दुपारी कवडशी पुनवट रस्त्यावर सापळा रचून अवैद्य रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरचा पाठलाग केला. कारवाईत पथकाने एक ट्रॅक्टर क्रमांक (MH29BP 4516) हे जागेवर पकडले. त्यावरील ड्रायव्हर तेथून पसार झाला. तर दुसऱ्या ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर ट्रॅक्टर मधील रेती जागेवर टाकून ट्रॅक्टरसह पसार झाला.
पकडण्यात आलेला ट्रॅक्टर पुनवट येथील कैलास पखाले यांची मालकीचा आहे. तर पळविलेले ट्रॅक्टर पुनवट येथीलच युवराज ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरपूरचे तलाठी भास्कर गणपत मार्कंड यांचे तक्रारीवरून दोन्ही ट्रॅक्टर चालक व मालक विरुद्ध पोलिस स्टेशन शिरपूर येथे कलम 379, 201, 34 भादवि सहकलम पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल करून पसार झालेले आरोपी व ट्रॅक्टर याचे शोधा करिता शिरपूर पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा व ट्रॅक्टरचा शोध घेत आहेत. सदर कार्यवाहीत 5 लाख 2 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपीवर कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.