मुकुटबन ठाणेदाराच्या उपस्थितीत शिवधर्म विवाह संपन्न
लॉकडाऊनचे नियम पाळून साध्या पद्धतीने विवाह
सुशील ओझा, झरी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व गर्दीचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे जुळलेले विवाह काहींनी समोर ढकलेले तर काहींनी ठरलेल्या तारखेतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुकुटबन येथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तथा जिजाऊ ज्ञान मंदीर कॉन्व्हेटचे संचालक संदीप आसुटकर यांनी लॉक डाऊनचे सर्व नियम पाळून शिवधर्म पध्दतीने लग्न केले. वधू नम्रता काकडे व वर संदीप आसुटकर यांनी तोंडाला मास्क व फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाला पाध्यान्य देत अगदी सहा जणांच्या उपस्थितीत कुठलाही खर्च न करता शिवविवाह केला.
या शिवधर्म विवाहाला मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठानेदार धर्म्मा सोनूने यांनी उपस्थिती दर्शवून या नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला, शिवविवाह पंचके शिवसेवक संजय गोडे व वसंत थेटे यांनी म्हटले.