शनिवारी शिवजयंती निमित्त वणीत अविनाश दुधे यांचे व्याख्यान

मराठा सेवा संघातर्फे तालुक्यात व्याख्यानमालेचे आयोजन... अडेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जब्बार चीनी, वणी: शिवजयंती निमित्त वणी तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत या महोत्सवात तालुक्यात ठिकठिकाणी व्याख्यानमाला चालणार आहे. मराठा सेवा संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी वणीतील शिवतीर्थ (शिवाजी महाराज पुतळा) येथे संध्याकाळी 6 वाजता ज्येष्ठ पत्रकार व मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांचे वणीत व्याख्यान आहे. ते “सामान्य माणसांचा राजा: शिवाजी राजा” या विषयावर आपले विचार मांडणार आहे.

दि.20 फेब्रुवारी रोजी रविवारला केसुर्ली येथे मंगेश खामनकर, 21 फेब्रुवारी सोमवारला निवली येथे संदीप गोहोकार, 22 फेब्रुवारी मंगळवारी डोंगरगाव येथे प्रा.डॉ. करमसिंग राजपूत, 23 फेब्रुवारी बुधवारी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कोना येथे दत्ता डोहे, 24 फेब्रुवारी गुरुवारी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. या दिवशी छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे प्रा. दिलीप चौधरी चंद्रपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

अडेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
अडेगाव येथे 18 फेब्रुवारी रोजी अमरावती येथील अभ्यासक दिलीप साळुंखे यांचे सामान्य माणसांचा राजा: शिवाजी राजा” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोबतच स्पर्धा परीक्षेचेही आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी शनिवारी सकाळी ११.३० वाजता मंगेश झाडे व पूजा बांदूरकर याचा शिवविवाह संपन्न होणार आहे. सायंकाळी ५ ते ८ दरम्यान अडेगावत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीनंतर महोत्सवाचा समारोप आहे.

या महोत्सवास तमाम वणीकर शिवप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद डॉ. पंजाबराव शिक्षक परिषद यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

मारेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जैन स्थानक समोरील दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

 

Comments are closed.