छ. शिवाजी महाराज अंधश्रध्दा निर्मूलन करणारे थोर समाजसुधारक: प्रा. डॉ. संतोष बनसोड

लोटी महाविद्यालयात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान

विवेक तोटेवार, वणी: शिवाजी महाराजाच्या ताब्यात 280 किल्ले होते, त्यापैकी 111 किल्ले त्यांनी स्वतः निर्माण केले. त्यांच्या किल्ल्यातील किल्लेदार बहुतांश मराठा असत, परंतु 63 किल्ल्यांवरील किल्लेदार हे मागासवर्गीय होते. आजपर्यंत मागासवर्गीयांचा इतिहास प्रकशात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रध्दा निर्मूलन करणारे थोर समाजसुधारक होते. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कार्य शिवरायांनी केले, सर्वसमावेशक धोरण त्यांनी स्वीकारले, असे प्रतिपादन डॉ. संतोष बनसोड (विभाग प्रमुख नारायण राणा महाविद्यालय, अमरावती) यांनी केले. ते लोकमान्य टिळक महाविद्यालय द्वारा शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासनातील सर्वसमावेशक धोरण” या विषयावर 6 जून रोजी सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ. बनसोड यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. किल्ल्यांच्या प्रशासनात शिवरायांनी कोणताही जातीभेद न पाळता प्रत्येक जातीतील लोकांना कसे सामावून घेतले, गुणांची पारख करून, कौशल्य जाणून घेऊन शिवरायांनी किल्याच्या प्रशासनात सर्व जाती धर्माच्या लोकांची मदत घेतली, असे ही विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक सोनटक्के (सह.संचालक लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी) लाभले होते. त्यांनी सर्वगुणसंपन्न असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निस्वार्थ भावनेने राज्य निर्माण केल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रेखा बडोदेकर (इतिहास विभाग प्रमुख लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी) ह्यांनी केले. त्यांनी शिवरायांचे व्यवहार चातुर्य मुत्सद्दीपणा, धाडसी वृत्ती, लोकशाही व सर्वधर्म समभाव यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद बनसोड ह्यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. मनेश पारखी ह्यांनी मानले.

सदर कार्यक्रम हा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ वसंत डोंगरे, डॉ विकास गवई, डॉ गजानन सोडणार, डॉ. नितीन सराफ, डॉ.कैलाश गायकवाड, डॉ वाजिरे, डॉ.नागुलकर, डॉ जाधव, डॉ. भाकरे, डॉ गौरखेडे, डॉ संदेश वाघ, डॉ सिध्दार्थ जाधव, डॉ परमेश्वर जूनघरी, डॉ गजेंद्र सिंग यादव, प्रा. मनोज जंत्रे तथा महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक जुळले होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुवर्णा बुर्हान, प्रा.डॉ. आस्वले, प्रा.डॉ. पटेलपैक, डॉ कुथे, डॉ. प्रशांत पाठक, जयंत त्रिवेदी, पंकज सोनटक्के यांनी सहकार्य केले.

Comments are closed.