शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत OTS योजनाची अंमलबजावणी करा

वणी शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0

गिरीश कुबडे, वणी: महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 हि जाहीर केली. त्या योजनेचे निकष विचारात घेऊन ओटीएस योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी वणी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

सदर योजनेमध्ये दिनांक 01-04-2009 ते दिनांक 31-3-2016 पर्यत उचल केलेल्या पीक मध्यम मुदती कर्जाची दिनांक 30-06-2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून दिनांक 31-03-2017 पर्यत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम कर्जमाफीस पात्र आहे. तसेच रुपये 1.50 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यासाठी एकवेळ समझोता योजना (One time settlement) जाहीर केली असून त्यानुसार पात्र शेतकऱ्यानी त्यांच्या हिश्य्याची संपूर्ण रक्कम दिनांक 31-03-2018 पर्यत जमा केल्यावर शासनतर्फे रुपये 1.50 लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल अशी तरतूद आहे.

परंतु यामध्ये बदल करण्यात येत असून 31 जुलै 2017 नंतर प्रत्यक्ष जमाखर्च होईपर्यतच्या कालावधीचे व्याज आकारू नये. तसेच यापूर्वी OTS अंतर्गत ज्या शेतकरी सभासदांकडून 31 जुलै 2017 नंतरचे व्याज वसूल करण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांना वसूल केलेले व्याज बचत ठेव खात्याला जमा करून परत करण्यात यावे असे शासन निर्देश असतांना सुद्धा राष्ट्टीयकृत बँकेकडून दिनांक 31 जुलै 2017 नंतर सुद्धा व्याजाची आकारणी करतांना दिसून येत आहे. या सदर्भात बँकमध्ये शेतकऱ्यांनी विचारणा केली असता आम्हाला अश्या कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.हि अतिशय गंभीर स्वरूपाचे बाब आहे.

तरी सदर या बाबीवरील बदल विचारात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत एकवेळ समझोता योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे अन्यथा शिवसेना 1 सप्टेंबर पासून प्रत्येक बँकांमध्ये आंदोलन करतील असा इशारा या वेळी शरद ठाकरे,गणपत लेडांगे, अभय सोलमलकर,राजू तुराणकर,महेश सोमलकर, सतीश वऱ्हाटे, प्रदीप निखाडे, महेश चौधरी, तेजराज बोढे या शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून इशारा देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.