पाहा छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा

शिवरायांचा छावा सुजाता थिएटरमध्ये रिलिज....

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं, त्या हिमालयाएवढं कर्तृत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट आज शुक्रवारी दिनांक १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल झाला आहे. हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून  माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची, शौर्याची, अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. भूषण यांच्यासोबत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर,विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, अमित देशमुख, अवधूत गांधी, रवी काळे या दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.