अवैध धंदे बंद झाले नाही तर गाठ शिवसेनेशी: विश्वास नांदेकर
गजगोटा मोर्चाने दणाणली वणी, हजारोंचा सहभाग
विवेक तोटेवार, वणी: मी आमदार असताना वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व अवैध धंदे बंद होते. मात्र आज परिसरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. याने कुटुंब तर उद्ध्वस्थ होत आहे सोबतच शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आम्ही नम्रपणे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. जर हे धंद लवकरात लवकर बंद झाले नाही तर गाठ शिवसेनेशी आहेा . मग हे धंदे कसे बंद करायचे हे आम्ही शिवसेना स्टाईल दाखवून देऊ. अशा इशारा माजी आमदार व शिवसेना जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांनी दिला. वणीत झालेल्या गजगोटा मार्चामध्ये ते बोलत होते.
परिसरातील अवैध धंदे बंद व्हावे तसेच शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेतर्फे वणीत आज गजगोटा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता वणीतील टिळक चौकातून गजगोटा मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात वणी विधानसभा क्षेत्रातून हजारों कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा हा मोर्चा होता. दफड्याच्या ठेक्यावर वाजत गाजत, सरकारविरोधात नारेबाजी करत, जय भवानी जय शिवाजी, शिवसेनेचा वाघ आला अशी घोषणाबाजी करत हा मोर्चा टिळक चौकातून खाती चौक, जत्रा मैदान रोड, टागोर चौक असा मार्गक्रमण करत याची सांगता टिळक चौकात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या बैलगाड्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. टिकळ चौकात या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले.
या सभेचे माजी पंचायत समिती सभापती अनिल राजूरकर, उपजिल्हा महिला संघटिका डिमनताई टोंगे, वणी विधानसभा संपर्क प्रमुख संजय रावराणे, मुंबई यांचे भाषण झाले. त्यानंतर विश्वास नांदेकर यांचे भाषण झाले. त्यांनी परिसरातील अवैध दारू, जुगार, मटका, बंद करावे, वाढलेले इंधनाचे दर, शेतक-यांचे प्रश्न यावर सरकारला धारेवर धरत शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मत्ते यांनी केले तर संचालन राजू तुराणकर यांनी केले. या मोर्चासाठी खेड्यापाड्यातून हजारों लोक आले होते. या शक्तीप्रदर्शनामुळे कडवट शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.