जिथे गरज तिथे शिवसेना आणि शिवसैनिक – संजय देरकर
अनेक युवकांचा देरकर यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश
विवेक तोटेवार, वणी: युवा पिढी ही नव्या युगाचा आधार आहे. सोबतच या युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अनेक युवक- युवती शिवसेनेसोबत जोडली आहेत, जिथे मदतीची गरज आहे तिथे शिवसेना आणि शिवसैनिक अशी पक्षाची ओळख आहे. त्यामुळे जिथे सर्वसामान्यांना गरज असेल तिथे शिवसैनिकांनी पोहोचलेच पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी केले. वणी शहरात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
संजय देरकर यांनी पद स्वीकारताच संघटन बांधणीचा धडाका लावला आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी ते संपर्क साधून त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नुकताच वणीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा नेतृत्वात व सुधीर ठेंगणे, रवि बोडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी आकाश पेंदोर, मयूर निब्रड, वासीम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान, अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विकेश साळुंके, उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार, इत्यादींसह मोठ्या प्रमाणात युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी युवकांनी संघटीत होऊन संघटनेची शक्ती वाढवली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
युवा पिढी हाच नव्या युगाचा आधार – संजय देरकर
शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढणारी संघटना आहे. शिवसेना केवळ राजकीय पक्षच नाही तर अन्याय अत्याचाराविरुद्ध उठणारा बुलंद आवाज आहे. युवा पिढी हाच नव्या युगाचा आधार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी युवकांना पक्षाशी जोडून उद्धव साहेबांचे हात मजबूत करावे.
– संजय देरकर, विधानसभा प्रमुख
यावेळी रवी बोडेकर, गौतम सुराणा, जगन जुनगरी, विनोद ढुमणे, संतोष राजूरकर, हरी कार्लेकर, शिवराज दुमणे, चेतन उलमाले, ऋषी काकडे, प्रशांत बल्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments are closed.