आयुर्वेदिक उपचाराने 70 वर्षीय डायबेटिक आजोबांची जखम तीन महिन्यांत बरी

डॉक्टरांनी दिला होता पाय कापण्याचा सल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर, वणी येथील 70 वर्षीय दौलत विठू कालेकर यांना शेतात काम करताना लोखंडी तार लागल्याने पायाला जखम झाली. प्राथमिक उपचारानंतर जखमेत संसर्ग होऊन पस निर्माण झाला आणि पाय सुजला. कालेकर यांना मधुमेह असल्याने जखम बरी होण्यास विलंब होत होता.

चार महिने वैद्यकीय उपचार घेऊनही जखम बरी न झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे (अ‍ॅम्प्युटेशन) पाय कापण्याचा सल्ला दिला. दरम्यान कालेकर यांना त्यांच्या एका परिचितांकडून ढुमे नगर येथील श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय, जगन्नाथ महाराज देवस्थानच्या मागे याचा संदर्भ मिळाला. तिथे शस्त्रक्रिया टाळून उपचार केला जाऊ शकतो अशी माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सेकंड ओपिनियन म्हणून येथील उपचार घेणे पसंत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिथे डॉ. अभिषेक पटले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधी, जलौकावचरण (लीच थेरपी), धूपन, लेप आणि पथ्यकर आहाराद्वारे उपचार करण्यात आले. अवघ्या तीन महिन्यांत त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली. या उपचारामुळे कालेकर यांचा पाय वाचला आणि शस्त्रक्रियेची गरज टळली. आयुर्वेदिक उपचाराच्या या यशस्वी परिणामामुळे परिसरात श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालयाची प्रशंसा होत आहे.

Comments are closed.